Hosea 5

1याजकांनो!
हे एका इस्राएलाच्या घराण्या लक्ष दे,
हे राजघराण्या ऐक, तुम्हा सगळ्यांचा न्याय होणार आहे
तुम्ही मिस्पावर पाश
आणि ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात.
2बंडखोर खोल कत्तलीत राहतात
पण मी त्या सर्वांना शिस्त लावेन.

3एफ्राईम मला माहित आहे

आणि इस्राएल माझ्यापासून लपलेला नाही
एफ्राईम तू एका वेश्येसारखा झाला आहेस,
इस्राएल अशुद्ध झाला आहे.
4त्यांचे कृत्य त्यांना माझ्याकडे त्यांच्या देवाकडे परत येऊ देत नाही,
कारण त्यामध्ये व्यभिचारी आत्मा राहतो
आणि ते आपला देव परमेश्वरास ओळखत नाही.

5इस्राएलाचा गर्व त्याचाच विरोधात साक्ष देतो,

इस्राएल व एफ्राहम आपल्या अपराधात ठेचाळणार
आणि यहूदा सुध्दा त्यांच्या सोबत अडखळेल.
6ते परमेश्वराचा शोध आपली मेंढरे व गुरे घेऊन करतील
परंतू तो त्यांना सापडणार नाही,
कारण त्याने त्याचा त्याग केला आहे.
7ते परमेश्वराशी अविश्वासू राहिले
कारण त्यांनी अनैरस मुलांना जन्मास घातले
आता चंद्रदर्शन होताच त्यास भूमीसहीत खाऊन टाकेन.

8गिबात शिंग

आणि रामात तुतारी फुंका;
तुझ्यामागे, हे बन्यामिना!
असा रणशब्द बेथ अविन येथे करा.
9शासनाच्या दिवशी एफ्राहम नाश पावेल
इस्राएलाच्या वंशास मी खात्रीने होणारी गोष्ट कळवली आहे.

10यहूदाचे पुढारी सिमेचा दगड सारणाऱ्यासारखे आहेत,

मी माझा राग त्यांच्यावर पाण्यासारखा ओतणार.
11एफ्राहमाचा चुराडा झाला आहे,
न्यायामध्ये त्याचा चुराडा झाला आहे,
कारण त्याने मनापासून मूर्त्यांना दंडवत करण्याचे ठरवले आहे.

12ह्यास्तव मी एफ्राईमाला कसर

आणि यहूदाच्या घराण्यास किडीसारखा होईन.
13जेव्हा एफ्राईमाने आपला रोग
आणि यहूदाने आपली जखम पाहिली
तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला,
आणि आपला दूत त्याने महान राजाकडे पाठविला
पण तो त्यास आरोग्य देऊन
त्यांची जखम बरी करू शकला नाही.

14हयास्तव मी एफ्राईमास सिंह

आणि यहूदा घराण्यास तरुण सिंहासारखा होईन;
मी, हो मीच त्यांना फाडून टाकीन
व घेऊन जाईन,
आणि त्यांना सोडविणारा कोणी नसेल.
मी आपल्या स्थानी परत जाईन,
जोपर्यंत ते आपल्या दोषांची कबुली देत नाहीत आणि माझे मुख शोधत नाहीत
जोपर्यंत ते आपल्या दु:खात कळकळीने माझा शोध घेऊन म्हणत नाहीत.
15

Copyright information for MarULB